spot_img
19.9 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img

केजमध्ये दुचाकी अपघातात १८ वर्षीय युवक ठार

केज : अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असणारा त्याचा मित्र जखमी आहे. ही घटना गुरूवारी (दि.२१) सकाळी ९ च्या सुमारास केज तालुक्यातील मस्साजोग येथे घडली. बालाजी मनोहर केदार वय (वय १८) असे मृत युवकाचे नाव आहे.

केज तालुक्यात मस्साजोग येथील युवक बालाजी केदार हा आपला मित्र उमेश केंद्रे (१८ वर्ष) याच्याबरोबर केजहून त्यांच्या सारणी (सांगवी) या गावाकडे जात होते. यादरम्यान ते मस्साजोग येथील हॉटेल संघर्ष समोर आले असता त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये बालाजीचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या पाठिमागे बसलेला त्याचा मित्र उमेश हा गंभीर जखमी झाला. अपघातात नंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच बिट जमादार दत्तात्रय बिक्कड हे घटनास्थळी दाखल झाले.

ताज्या बातम्या