वडवणी : मुकादमाने जीपमध्ये लोकमत न्यूज नेटवर्क ठेवलेले अडीच लाख रुपये काच फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना वडवणी शहरात गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. ऊसतोड मुकादम चोले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खडकी येथील रामकिसन चोले राहणार खडकी हे गेल्या काही वर्षांपासून मुकादम म्हणून काम करतात त्यांचा करार कर्नाटक येथील बसवेश्वर कारखान्याकडे आहे. ऊसतोड मजुरांसाठी कारखान्याकडून आलेले चार लाख रुपये चोले यांनी वडवणी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येथील शाखेतून गुरुवारी काढले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या जीपच्या चालकाच्या सीट खाली एका बॅगमध्ये ठेवले होते. या रकमेसोबत दोन चेकबुक ही होते. चोले हे आपली जीप घेऊन एका पेट्रोल पंपासमोर गॅरेजवर थांबले.चोले हे समोरच्या गॅरेजवर लाईट फोकस आणि टपाचे काम पाहण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने गाडीचे काच फोडून चालकाच्या सीट खाली ठेवलेले अडीच लाख रुपये चोरून नेले. थोड्या वेळाने चोले हे जीपजवळ परत आले असता जीपच्या काच फोडून सीट खालील पैसे चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वडवणी पोलिस ठाणे गाठले. चोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, तपास सफौ. गित्ते हे करीत आहेत.