spot_img
5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

प्रमोद महाजनांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र

मुंबई : भाजपाच्या नेत्या तथा माजी खासदार पूनम महाजन यांनी त्यांचे वडील प्रमोद महाजन (झीरोव चरहरक्षरप) यांच्या हत्येबाबत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. माझ्या वडिलांच्या हत्येमागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत त्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. पूनम महाजन यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पूनम महाजन यांनी ’मुंबई तक’ या माध्यमाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे वडील प्रमोद महाजन यांच्या हत्येवर भाष्य केलं. यावेळी बोलताना मी गेल्या काही वर्षांपासून याबाबत बोलत आहे. ज्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली, त्या बंदुकीचे आणि गोळीचेही पैसे प्रमोद महाजन यांचे होते. कोणी कोणावर रागाने असा अन्याय करतं तेव्हा तुम्ही एखाद्या व्यवस्थेचं, यंत्रणेचं उल्लंघन करत असता. हे मी पहिल्यापासूनच बोलत आहे. माझ्या वडिलांवर गोळ्या झाडणारे हात, गोळी त्या माणासाचे होते. त्या व्यक्तीचा त्यामागे काहीतरी राग असेल. पण त्या हत्येमागचं कारण आणि ती बुद्धी फक्त एका कोणत्यातरी फालतू भांडणाची नाहीये, असा दावा त्यांनी केला.
तसेच, माझ्या वडिलांच्या हत्येमागे काहीतरी कारण आहे. मी त्या कारणाला कधी राजकीय म्हटले नाही. पण त्या हत्येमागे काहीतरी मोठं कारण आहे. त्यामागे षडयंत्र आहे, असं दिसतं, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

ताज्या बातम्या