सात लाखाचा ऐवज लंपास सिरसाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
किल्लेधारूर तालूक्यातील शिंगनवाडी येथे गुरूवारी दुपारी तिन घराचे दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यानी सोन्या चांदीचे दागीणे व नगदी पैसे असे सात लाख रुपयाचा माल अज्ञात चोरट्यानी लंपास केला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
तालूक्यातील शिंगनवाडी येथे गुरूवार दि 7 नोव्होंबर रोजी दुपारी कृष्णा महादेव जाधव या़चे घराचे तिन दरवाजे तोडून जबरी चोरी झाली आहे जवळ – जवळ सोन व पैसे मिळून ७ लाख रुपये इतकी रक्कम भर दुपारी तीन घराचे दरवाजाचे कुलप तोंडून आज्ञात चोरानी घर फोडून चोरी केली आहे सध्या शिंगणवाडी येथील नागरिक भयभीत आहेत .सिरसाळा पोलीस स्टेशन चे पोलीस पुढील तपास करत आहेत सिरसाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आलते पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत