spot_img
5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

केजमध्ये स्कॉर्पिओने मोटारसायकलस्वारास उडविले

केज : तालुक्यातील पिंपळगाव फाटा ते विडा रोड दरम्यान दुपारी स्कॉर्पिओ आणि मोटरसायकलचा अपघात झाला असून यामध्ये पिंपळगाव येथील अशोक पोपट राऊत हे गंभीर जखमी झाले आहेत.
तालुक्यातील पिंपळगाव येथील अशोक पोपट राऊत (४५) हे आपल्या दुचाकीवरून गावाकडे निघाले असता स्कॉर्पिओ आणि मोटरसायकल ची धडक झाली. यामध्ये अशोक राऊत यांच्या डोक्याला व छातीला गंभीर मार लागला आहे. सदरील घटनेची माहिती कळताच तातडीने अशोक यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. सदरील अपघात हा नेमका कसा झाला ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ताज्या बातम्या