spot_img
11.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या गाडीचा भिषण अपघात

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांचा कारचा अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरती पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. धनंजय मुंडेंच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यात भीषण धडक झाली. राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
अपघाताची घटना सोरतापवाडी या ठिकाणी घडली, महामार्गावरून जाताना राजश्री मुंडे यांची कार आणि ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक झाली. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी पोहोचून मदतकार्य सुरू केलं.
या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. अपघातानंतर त्यांची प्रकृती तपासून त्यांना काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.या भीषण अपघाताचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. अनेकदा अतिवेग, वाहनावरील नियंत्रण सुटण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. यावरती उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या