spot_img
5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

महाराष्ट्रात होणार 20 नोव्हेंबरला मतदान 23 रोजी निकाल

नवी दिल्ली  : गेल्या काही दिवसांपासून निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता होती. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून दिनांक 20 नोव्हेंबरला रोजी मतदान होणार असून 23 रोजी निकाल निकाल लागणार आहे.
2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसर्‍या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसर्‍या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.

महत्त्वाचं म्हणजे, निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबरला सुरू होणार असून अर्ज भरण्याची मुदत २९ ऑक्टोबरला संपणार आहे. म्हणजेच, अर्ज भरण्यासाठी आजपासून फक्त १४ दिवस उरले आहेत. त्यामध्येही तारखा आणि सुट्ट्यांचा विचार करता दिवस कमी मिळतात. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची धावपळ होणार हे नक्की. दरम्यान, ३० नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.
निवडणुकीच्या तारखांसबंधी काही इंटरेस्टिंग गोष्टी
– महाराष्ट्रात मंगळवारपासून (१५ ऑक्टोबर) आचारसंहिता लागू.
– २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल.
– म्हणजेच, १५ व्या विधानसभेचे आणि महाराष्ट्राचे नवीन कारभारी २३ नोव्हेंबरला ठरणार.
– या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर अशी आहे.
– २६ ऑक्टोबरला शनिवार तर २७ ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे, २२ ते २५ आणि २८ ते २९ असे सहा दिवसच अर्ज भरण्यासाठी वेळ असेल.
– याचाच अर्थ अर्ज भरण्यासाठी आजपासून उरले अवघे १४ दिवस.
– तसेच, छाननी ३० ऑक्टोबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत असेल.
– याचाच अर्थ, दिवाळीमुळे अर्ज मागे घेण्यासाठी जादा वेळ असणार.
– एकूणच, उमेदवारांना यावेळी प्रचारासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.
– १८ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे प्रचारासाठी जवळपास एक महिना मिळणार आहे.
– आजपासून ३९ दिवसांत महाराष्ट्राची निवडणूक आटोपणार.
– अर्जांची छाननी ते माघारीत ४ दिवसांचा वेळ.
– कुणी बंड केल्यास, त्याला समजवण्यासाठी ४ दिवसांचा वेळ मिळणार.
असे असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक –
निवडणुकीचं नोटिफिकेशन : २२ ऑक्टोबर २०२४
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : ३० ऑक्टोबर २०२४
अर्ज मागे घेण्याची तारीख : ४ नोव्हेंबर
मतदान : २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणी : २३ नोव्हेंबर २०२४

महायुती-महाविकास आघाडीचं बलाबल-
महायुती-162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019मध्ये असे होते संख्याबळ
भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13
एकूण – 288

ताज्या बातम्या