मुंबई : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सात सदस्यांनी आज (दि. 15) विधानभवनात शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी शपथ दिली. यामध्ये भाजपच्या तीन, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी शपथ घेतली.
या सदस्यांमध्ये भाजप : 1) श्रीमती चित्रा किशोर वाघ 2) श्री विक्रांत पाटील 3) श्री धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड राष्ट्रवादी अजित पवार गट : 4) श्री पंकज छगन भुजबळ 5) श्री इद्रिस इलियास नाईकवाडी शिंदे गट : 6) श्री हेमंत पाटील 7) डॉ श्रीमती मनीषा कायंदे यांचा समावेश आहे.