मंगलकार्यात राहण्याची सोय;मनोज जरांगेच्या मेळाव्याला मराठे पुन्हा एकवटणार!
बीड :मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी सहाव्यांदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले आहे. मनोज जरांगे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पाटील दसर्याला भव्य मेळावा घेणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून याची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. नारायणगडावर 175 एकर मैदानात हा मेळावा होणार असून 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. दरम्यान झालेल्या बैठकीत वीस लाखांचा निधी प्राप्त झालाय. तर मुस्लिम समाजानेही देणगी दिली आहे.
राज्यातील मराठयांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणार्यासाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणार्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळाव्याला तुफान पोर येणार आहेत. कधी दसरा येतो अशी खूप आशा लागली आहे. कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा आहे. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नारायणगडावरील दसरा मेळाव्याला या, असे मनोज जरांगे म्हणाले.