नाशिक | ज्ञानेश्वर काकड
सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडझिरे येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. सदरच्या समितीच्या पुनर्गठन करणे कामी सर्व वर्गांचे पालक उपस्थित होते .उपस्थित पालकांमधून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांची निवड करण्यात आली .त्यानंतर उपस्थित सर्व पालकांच्या संमतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून श्री योगेश अंबादास बोडके व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री सुनिल दशरथ जगताप यांची निवड करण्यात आली.
सदरच्या शाळा व्यवस्थापन समितीवर श्री तुषार भाऊ आंबेकर, श्री प्रकाश वाळीबा सांगळे ,श्री दीपक बापू बोडके, श्री संजय भाऊराव बोडके, श्रीमती सरला मंगेश रोकडे ,श्रीमती सरिता देविदास कुटे, श्रीमती छाया शरद पवार ,श्रीमती सुनिता दत्तू नागरे यांची शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आले
सदर शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी प्रसंगी वडझिरे गावचे समाजसेवक श्री अर्जुन आप्पा बोडके व पालक मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते सर्व सदस्यांची निवड शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात झाली शेवटी सर्व नवनियुक्तांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. सर्व पालकांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री शेवाळे सर यांनी आभार मानून समारोप केला.