spot_img
19.7 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

गेवराईत पकडल्या १८ तलवारी

गेवराई : अवैध मार्गाने विक्री साठी आणलेल्या १८ नव्या कोर्‍या तलवारी गेवराई पोलीसांनी सापळा रचून आरोपीसह ताब्यात घेऊन मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. शनिवार ता. १४ रोजी रात्री ३ वाजता पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक करून अठरा तलवारी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात असून, कायदा सुव्यवस्थेत बाधा निर्माण करणार्‍यां समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी सांगितले आहे. दरम्यान, अवैध हत्यारे विक्री करणे आणि त्या घेणे कायद्याने गुन्हा असून, या मार्गाने जाणार्‍यांवर पोलीसांची करडी नजर असल्याची माहिती आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी भगवान फकीरा पवार हा अवैध मार्गाने तलवारी आणून विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस अधिकारी आरोपीचा पिच्छा करीत होते. मात्र, आरोपी गुंगारा देत होता. लोकेशन मिळत नव्हते. शनिवार ता. १४ रोजी आरोपीचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून आरोपीसह, १८ नव्या कोर्‍या तलवारी ,दुचाकी वाहन जप्त करून, आरोपीला जेरबंद केली आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरु यांना मिळालेल्या गोपनिय माहितीने, गेवराई येथील पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी १४.०९.२०२४ रोजी २३-०० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर त्रिमुर्ती हॉटेल जवळ पाडळसिंगी टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपी भगवान फकीरा पवार वय ४० वर्ष रा हिरापुर ता गेवराई जि बीड यास मुद्देमालासह ताब्यात घेतले आहेत. सपोनि दिपक लंके यांच्या फिर्यादीवरुन कलम ४/२५ आर्म क्ट १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविपोअ नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पोनि. प्रविणकुमार बांगर, सपोनि दिपक लंके, सपोनि संतोष जंजाळ, सपोनि सचिन कापुरे , पोउपनि शिवाजी भुतेकर, अशोक शेळके, श्रीमंत उबाळे बन, सुरेश पारधी, कडाजी मदने, रामेश्वर काकडे, परळकर , तांदळे , विकास सांळुके, रेंगे बन, श्रीधर सानप, अंगद पिंपळे, विजय परजणे, प्रल्हाद देवडे, रामनाथ उगलमुगले, सुनिल राठोड, महेद्र ओव्हाळ, प्रदिप पिंपळे, होमगार्ड कांबळे, अनिल ढाकणे, महिला होमगार्ड शर्मा, कोकाट, शितल सोळुंके यांनी कारवाई केली आहे. सदरील गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधिकारी डॉ. शिवाजी भूतेकर करीत आहेत. आरोपी कधी आणि कुठून अवैध मार्गाने तलवारी आणतो आणि विक्री करतो. या संदर्भाने गेवराई पोलीस कसून शोध घेणार आहेत. पोलीसांची करडी नजर असून, गुन्हेगारांची खैर नाही. अशी चर्चा होऊ लागली आहे.

ताज्या बातम्या