spot_img
25 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

नगरमध्ये भरदिवसा कांदा व्यापार्‍यावर हल्ला,50 लाख लुटले

अहमदनगर : येथील नेप्ती कांदा मार्केट समोर कांदा व्यापार्यावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. व्यापार्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या जवळील सुमारे 50 लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली आहे. यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आडत आणि कांदा व्यापारी समीर सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत असताना बायपास रोडवर त्यांना काही दरोडेखोरांनी घेरले. यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांच्याकडील 50 लाखांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्राणघातक हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले आहेत.
व्यापार्‍याला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले जखमी व्यापार्याची भेट घेतली. चोरट्यांचा तातडीने शोध घेतला नाही तर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या