बीड जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधण्यासाठी महिला भगिनी मुंबईला रवाना
बीड तळागळातील माणसांची जाण असणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महिलांसाठी कल्याणकारी योजनांसह लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ माता भगिनींना झाला असून यापुढेही या योजनेचा लाभ महिलांना दरमहा मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल १५ हजारांवरून वाढवून ३० हजार करण्यात आले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. १० हजार महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी महिलांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आशा निर्माण झाली आहे. शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. यामुळे राज्यातील ’उमेद’च्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना एक कोटी राख्या पाठविणार आहे. याबरोबरोबरच बीड जिल्ह्यातून २ लाख राख्या घेऊन वीस महिला भगिनी लाडक्या भाऊराया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना राखीपौर्णिमा दिनी राख्या बांधण्यासाठी काल रात्री सायं ७.०० वाजताच्या दरम्यान बीड शहरातील जालना रोड येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून रवाना झाल्या आहेत. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप, सचिन भैय्या मुळूक शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांत अधिक योजना आणत आहेत. हे सर्व महिलांना दिसत आहे. मुख्यमंत्री हे आपले मोठे भाऊ आहेत, अशी भावना राज्यातील महिलांमध्ये निर्माण होत आहे. दरम्यान, राज्यातील बचत गटाच्या महिलांमार्फत राखी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांना राखी पाठविण्यात येणार आहे. शासनाने आणलेल्या नवीन योजनांमुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १९ ऑगस्ट राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी’ चलो मुंबई’ असा नारा गावागावात महिला देत आहेत. याप्रमाणेच बीड जिल्ह्यातून २ लाख राख्या घेऊन वीस महिला भगिनी लाडक्या भाऊराया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना राखीपौर्णिमा दिनी राख्या बांधण्यासाठी वर्षा निवास्थान मुंबई येथे रवाना झाल्या असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन मुळूक यांनी दिली आहे.