परळी : येथे गेल्या अनेक दिवसांपासून जुगार चालू होता. मात्र पोलिस प्रशासन आणि जुगार चालकांचे लागेबांधे असल्यामुळे या ठिकाणी धाड पडत नव्हत्या. जरी पडल्या तर स्थानिक गुन्हे शाखा बीडच्या पथकाने धाडी टाकलेल्या आहेत. सध्या नवीन पोलिस अधिक्षक बारगळ यांनी पदभार स्विकारला असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात धाडस्त्र सुरू केले आहे. त्यानुसार परळी येथील चक्री जुगार अड्डड्यावर छापा मारून बिंगो जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.
पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली झाल्यानंतर नवीन पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार स्विकारताच आपल्या कामकाजाचा नमुना दाखवायला सुरूवात केली आहे. परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत ऑनलाइन बींगो चक्री खुलेआम सुरू असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या आदेशावरून दिनांक १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता इशारातील संभाजीनगर भागामध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो चक्रीवर धाड मारून एका व्यक्तीसह लॅपटॉप सीपीयू सह ऑनलाइन बिंगो चक्रीसाठी लागणारे साहित्य सह ४०८७० रू मुद्देमाल पोलिसानी जप्त करून संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु र न१२९/२४ कलम १२ अ म जू का प्रमाणे गुन्हा दाखल केला.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुतळे,पो.ठोबरे, पो.दुबाले,पो.जोगदंड,पो.घोडके,पो.सानप,पो.कांबळे,पो.जायभाय,पो. वडमारे व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली.