अहमदनगर : विश्व निर्मल धर्म सहजयोगा प्रणित स्वयं श्री माताजी प्रमुख ट्रस्टी संचालित ईंग्लिश मेडीयम स्कुल क्षेत्र पुणतांबा जि अहमदनगर महाराष्ट्र येथे स्वातंत्र्यदिन चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला साजरा करण्यात आला.
परमपूज्य श्री माताजींच्या श्रीचरणांची पूजा अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची आणि रुपरेषा प्रस्तावना मुख्याध्यापिका जॉन मॅडम यांनी मांडली . यामध्ये शाळेविषयी पालकांना सर्व माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सहजयोगी श्री प्रशांत राजवळ साहेब ( कृषी अधिकारी) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच अतिशय सुंदर, अप्रतिम असे भाषणे ही केली.
श्री अशोकराव तरकसे, श्री निलेश जोबनपुत्रा, श्री भरत सुर्यवंशी यांच्या हस्ते शालेय वस्तूंचे वाटत करण्यात आले. पुणतांबा गावातील सर्व मान्यवर पालक आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अ.नगरचे सहजयोगी श्री. रवी आगरकर, श्री. नितीन देवळालकर,श्री. अविनाश आडेप,श्री.मनोहर म्याना. श्री विशाल संभार या सर्व सहजयोगी बांधवांनी शाळेसाठी उपयुक्त खेळाचे सर्व साहित्य आणि वॉटर बॅग मुलांना देण्यात आले. तसेच डॉ.श्री. सुनील मोरे आणि डॉ. सौ.नलिनी मोरे यांच्या हस्ते मुलांना शालेय बॅग देण्यात आली.
सौ.अबोली कोल्हे ताई यांनी हि शाळेसाठी आर्थिक मदत केली.श्री माताजी यांची इच्छा आणि स्वप्न असणार्या या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सहजयोगी हातभार लावत आहेत.या परिसरामध्ये या शाळेचा नावलौकिक वाढावा यासाठी अनेक सहजयोगी प्रयत्नशील आहेत.
यानंतर श्री निलेश जोबनपुत्रा आणि श्री अशोकराव तरकसे यांनी सर्वांचे आभार मानले. अशीच अजून कोणाला काही मदत करावयाची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी श्री निलेश भाई जोबनपुत्रा -९४२३१६१६८८..श्री अशोक जी तरकसे -९१३०००५९३७.श्री शिवाजी काळे -९०२८१३५१२१. नचिकेत तुरकणे _९१७५५४३८२३.