नोटा आणि बाद मतांची संख्या तीनशे वर
बीड : बीड जिल्हा वकील संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. वकील संघाच्या अध्यक्षपदी ड. रोहिदास येवले यांची निवड झाली. तर सचिव पदी ड. सय्यद यासेर पटेल यांची निवड झाली. वकील संघात नोटाला पडलेली मते आणि बाद मतांची संख्या ३०० वर पोचली. एक वर्षाच्या कार्यकाळासाठी ही निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी ड. रवींद्र किर्दत यांनी चोख कामगिरी बजावली.
अध्यक्षपदासाठी ड. रोहिदास येवले यांना ३३९ मते पडली. तर प्रतिस्पर्धी प्रभाकर आंधळे यांना २९२ मते पडली. तर गणेश करांडे यांना २२ मध्ये पडली. बाद ३ मते तर नोटाला १४ मध्ये पडली. या रोहिदास येवले ४७ मतांनी विजयी झाले.
उपाध्यक्ष पदासाठी नितीन वाघमारे आणि अविनाश गडगे यांना समान मते पडल्यामुळे दोघांना सहा – सहा महिन्यासाठी कारभार वाटून देण्यात आला. तर सचीव पदासाठी सय्यद यासेर पटेल यांना ३२६ तर राम दहिवाळ यांना ३०५ मते पडली. बाद २५ मते तर नोटाला १४ मते पडली. नासेर पटेल हे २१ मतांनी विजयी झाले. सहसचिव पदासाठी श्रीकांत जाधव यांना २६५, वीरेंद्र थिगळे यांना २४५ तर दिनेश नाटकर यांना ८२ मते पडली. यामध्ये बाद मतांची संख्या ७३ आणि नोटाला ८ मते पडली. तर कोषाध्यक्ष पदासाठी धनंजय गिराम यांना ४०८ मते पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शेख जावेद बशीर यांना २३२ मते पडली. यात बाद मतांची संख्या ५ तर नोटाला २५ मते पडली.
ग्रंथपाल सचिव पदासाठी ऍड. भीमा जगताप यांना ४१३ मते पडली. तर योगेश पवार यांना १८६ मध्ये पडली. या पदाला बाद मते ३६ तर नोटाला ३५ मध्ये पडली. महिला प्रतिनिधी या पदाला ऍड. छाया वाघमारे यांना ४०५ मध्ये तर ऍड मंदा संकपाळे यांना २३२ मते पडली. बाद मतांची संख्या ११ तर नोटाला २२ मते पडली.
संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ड. रवींद्र किर्दत यांनी काम पाहिले. त्यांना उमेश धांडे, रमेश राऊत, सुधीर जाधव, सदानंद वाघमारे, लिंबराज लाखे, आणि हनुमान साबळे यांनी सहाय्यक म्हणून भूमिका बजावली.
यावेळी इतर कोणत्याही वकील संघात यावर्षी मतदान केले नाही अशा प्रकारचे एक घोषणापत्र तर ए.आय.बी.इ. परीक्षा पास झाल्या संदर्भातील दुसरे घोषणापत्र मतदारांकडून भरून घेण्यात आले. त्यामुळे ड. अजित एम देशमुख यांनी दिलेल्या निर्णयाचे पालन झाले. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने निवडणूक होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी ड किर्दत यांनी चोख कामगिरी बजावल्यामुळे वकील संघाच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्व गडबडीत अन्य तालुक्यातील कोणीही बीडमध्ये मतदान टाकण्यासाठी आले नाही. परीक्षा पास नसलेले देखील मतदान करू शकले नाहीत. म्हणून ७८० सदस्यांची मतदार यादी असताना ११० मतदान कमी झाले. मतदान कमी होण्याचा हा वकील संघाच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे. हा आदर्श जिल्ह्यातील इतर वकील संघ तर घेतीलच पण महाराष्ट्र राज्यात देखील पोहोचेल, असे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी ड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.