spot_img
3.5 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img

गावठी पिस्टल जवळ बाळगणारा 307 मधील आरोपी पकडला

बीड: शहरातील तेलगाव नाका येथे गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने अभिषेक डोंगरे नामक व्यक्तीला विचारपूस केली व त्याची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ अवैधरित्या गावठी पिस्टल आढळून आले. सदरील आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरूध्द पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हयात अवैधरित्या गावठी पिस्टल जवळ बाळगणारे इसमाविरुध्द कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करुन पोलीस उप-निरीक्षक खटावकर यांचे पथकास सुचना दिल्या. त्यावरुन तसेच पोलीस स्टेयशन पेठ बीड गुरनं 170/2024 कलम 307,143,147,148,149 भादवि मधील आरोपीचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे अभिषेक डोंगरे हा तेलगांव नाका, बीड येथे उभा आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन मा. पोलीस निरीक्षक शेख साहेब यांचे आदेशाने पोलीस उप- निरीक्षक खटावकर व स्टाफ यांनी तात्काळ तेलगांव नाका, बीड येथे जाऊन सदर इसमांस ताब्यात घेवुन त्याची विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव अभिषेक विश्‍वास डोंगरे वय 23 वर्ष रा. इमामपुर रोड, बार्शी नाका, बीड असे सांगितले त्याचे ताब्यातुन दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस व एक खाली केस असा एकुण किंमती 82,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन त्याचेवरती पोलीस स्टेशन पेठ बीड गुरनं 215/2024 कलम 3/25 भाहका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी ही मा.श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, बीड, श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, बीड व पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक श्रीराम खटावकर, पोह/मनोज वाघ, पोह/अशोक दुबाले, पोना/विकास वाघमारे, पोना/सोमनाथ गायकवाड, पोकॉ/सचिन आंधळे, पोकॉ/अश्‍विनकुमार सुरवसे, पोकॉ/नारायण कोरडे, पोकॉ/सुनिल राठोड सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.

ताज्या बातम्या