spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

साई अर्बनलाही कुलूप लागले ; ठेवीदार अडचणीत

बीड : जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेटला कुलूप लागल्याने ठेवीदारांचे दिवाळे निघाले. शहरातील आणखी एखा मल्टीसोसायटीला कुलूप लागल्याने सदरील मल्टीस्टेटचे ठेवीदार अडचणीत सापडले. गेल्या दोन महिन्यापासून मल्टीस्टेट उघडण्यात आलेली नाही.
शहरातील सम्राट चौक भागात साई अर्बन क्रेडीट सोसायटीचे कार्यालय आहे. ही सोसायटी बीडयेथील विशेष लेखापरिक्षक कार्यालयातील श्रीकृष्ण ढगे यांचा मुलगा विशाल ढगे यांच्यानावे आहे. पिंपरगव्हाण रोडवरील व इतर अनेक ठेवीदारांनी या मल्टीस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली आहे. गेल्या दोन महिन्यापासून चेअरमन व संचालक तसेच श्रीकृष्ण ढगे हे बीडमधून गायब झाले आहेत. पैशाच्या संदर्भात ठेवीदार या बॅकेमध्ये सतत चक्रा मारतात. मात्र बँक बंद असल्याने त्यांना काहीही करता येत नाही. या प्रकरणता सहकार विभागात तक्रार करण्यात आल्याने यावर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. सदरील क्रेडीट सोसायटी दिवाळखोरीत निघाल्याने ठेवीदार अडचणीत सापडले.

ताज्या बातम्या