spot_img
-11.8 C
New York
Saturday, January 24, 2026

Buy now

spot_img

बीडच्या शिवसैनिकाने मुख्यमंत्र्यांकडे मागितली किडनी विकण्याची परवानगी

केज : तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्योतीकांत कळसकर यांचे वडील नागनाथ शंकरराव कळसकर यांनी काही अडचणीमुळे एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याच्या बदल्यात हमी म्हणून त्यांनी साळेगाव हद्दीतील जमीन सावकाराच्या नावे करून दिली होती. परंतु त्यावेळी त्यांच्यात असे ठरले की, कर्जाची रक्कम व व्याज पूर्णपणे फेड केल्यानंतर ही जमीन मूळ मालक नागनाथ कळसकर यांच्या नावे परत करण्यात येईल. त्याबाबत त्यांच्या स्टॅम्प पेपरवर तशा प्रकारचा करार देखील झालेला आहे.
दरम्यान नागनाथ कळसकर यांचे 18 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. नंतर ज्योतीकांत कळसकर व त्यांचा भाऊ यांनी ती जमीन परत नावावर करून देण्याची मागणी केली असता खासगी सावकाराच्या एजंटने ज्योतीकांत कळसकर यांना धमकी दिली. त्यांनतर ज्योतिकांत कळसकर यांनी बीडच्या जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक व जिल्हा निबंधक यांना निवेदन दिले परंतु त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
याउलट केज पोलिस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी हा साध्या कपड्यामध्ये गावातील एका युवकाला घेऊन त्या शेतामध्ये आले. त्यांनी माझ्या शेताबद्दल चौकशी केली. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि हा व्यवहार आपसांत मिटवून घेण्यासाठी दबाव टाकला. त्या पोलीस कर्मचार्‍याने त्या एजंटशी संगनमत करून आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली असल्याचे कळसकर यांनी निवेदनाद्वारे सांगितले.पैसे नसल्या कारणाने पोलीस, सावकार व त्याचा एजंट यांना पैसे देऊन त्यांच्याकडून जमीन परत मिळविण्यासाठी कळसकर यांनी स्वतःची किडणी विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी मुख्यंत्र्यांसह जिल्हाधिकार्‍यांना निवेदनात आहे.

ताज्या बातम्या