spot_img
3.2 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img

रायगड पोलीस भरती : बीडचे पाच जणांना पकडले

रायगड : राज्यभरात सर्वत्र पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावताना दिसत आहेत. मात्र रायगड जिल्हयात आज झालेल्या लेखी परीक्षेत ६ विद्यार्थ्यांनी गैर प्रकार केल्याचं उघड झालंय. यामध्ये बीडमधील सहा जणांचा समावेश आहे.चक्क कानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप डिव्हाईस बसवून या विद्यार्थांनी परीक्षा केंद्र गाठले आणि परीक्षा देण्यास सुरूवात केली. मात्र केंद्रावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी जेव्हा या विद्यार्थ्यांची झडती घेतली. यामध्ये तब्बल सहा विद्यार्थ्यांकडे या चिप आढळुन आल्या आणि अखेर या विद्यार्थ्यांचा पर्दाफाश झाला.
रायगड जिल्हयात पोलिस भरतीची प्रक्रिया मागील महिना भरापासून सुरू आहे . एकूण ३९१ पदांकरीता ही पोलिस भरती प्रक्रिया सूरु आहे. यासाठी राज्यातून एकूण ४७४७ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. पोलीस भरतीची परीक्षा म्हटली की जीवाची बाजी लावून वर्षानुवर्षे मेहनत करणारे विद्यार्थी आपला संपूर्ण सराव या भरतीसाठी लावतात. मात्र काहींच्या हाती आशा तर काहींच्या हाती निराशा येते. काही विद्यार्थी हे गैरव्यवहार करून ही परीक्षा उत्तीर्ण होतात आणि मेहनत करणार्‍या विद्यार्थ्यांच्या आशा लांबवतात. रायगड जिल्हयात सुरू असणार्‍या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत सु्द्धा असाच प्रकार समोरं आलाय. अलिबागमधील एका परीक्षा केंद्रावर तब्बल सहा विद्यार्थ्यांना परीक्षेतील उत्तर मिळविण्यासाठी सोबत डिव्हाईस घेऊन पेपर देत असताना रायगड पोलिसांनी रंगेहाथ पकडली आहे. हे विदयार्थी कानात डिव्हाईस घालुन बसले होते मात्र पोलिसांनी सावधगिरी बाळगत या सहा जणांना पूर्वतयारी निशी पकडले आहे.
गैरप्रकार करताना पोलिसांनी सापडलेल्या विद्यार्थ्यांची नावे
१) रामदास जनार्दन ढवळे – बीड जिल्हा
२) दत्ता सुभाष ढेंबरे – बीड जिल्हा
३) ईश्वर रतन जाधव – बीड जिल्हा
४) गोरख गंगाधर गडदे – बीड जिल्हा
५)सागर धरमसिंग जोनवाल – औरंगाबाद
६) शुभम बाबासाहेब कोरडे – बीड जिल्हा
अशी पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. पोलिस भरती लेखी परीक्षेत गैर प्रकार केल्याप्रकरणी या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या