spot_img
8.4 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img

सुरेश कुटेंच्या डेअरीची ४४०० कोटींची मालमत्ता जप्त होणार

बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून ठेवीदारांना करोडो रुपयाचा गंडा घातलेल्या सुरेश कुटे व इतर आरोपी विरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने फास आवळायला सुरुवात केलेली आहे. कुटे पती पत्नी यांचे नावे असणारी २३८ मालमत्तेची माहिती आहे. ४४०० कोटी ,२४लाख ,२०हजार रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. कुटेची मालमत्तेची माहिती मिळणेसाठी भारतातील सर्व राज्यातील नोंदणी महानिरीक्षक यांना पत्रव्यवहार सुरु आहे.
कुटे यांच्या विरोधात एमपीआयडीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे,अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली आहे. लवकरच सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्याची कार्यवाही चालू आहे. तसेच गुन्हयातील आरोपींची देशभरातील स्थावर व जंगम मालमत्तेचा शोध घेतला जात असून आहेत व त्या सील करण्यात येत आहेत.
ज्ञानराधा मल्टिस्टेट को. ऑप क्रेडीट सो.लि.बीड चे बीड जिल्हयात २२ शाखा असून सदर मल्टीस्टेट विरुद्ध जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनला आजपावेतो ४१ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामधील एकूण रक्कम ४२,३३,३७,००३/- रूपयाचा अपहार झालेबाबत तक्रारीमध्ये नमूद आहे. यामध्ये दररोज मोठया प्रमाणात वाढ होत. तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेटचे आजपावेतो १.३८८ ठेवीदार यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बीड येथे त्यांच्या एकूण ९५,८८,३९,४१९/ रूपये रकमेची विश्वासघात व फसवणूक झालेल्या तक्रारी व त्याबाबतचे पुरावे या शाखेत दिलेले आहेत. त्यावरून गुन्ह्याचे तक्रार मधील व एकूण-१३८,४१,७६,४२२/- रूपये रकमेची फसवणुक झाले बावत माहिती आजपर्यंत प्राप्त झालेली आहे. व त्यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेट को. ऑप क्रेडीट सो.लि.बीड चे बीड जिल्हयात २२ शाखा असून सदर मल्टीस्टेट विरुद्ध जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनला आजपावेतो ४१ गुन्हे दाखल झाले असून त्यामधील एकूण रक्कम ४२,३३,३७,००३/- रूपयाचा अपहार झालेबाबत तक्रारीमध्ये नमूद आहे. यामध्ये दररोज मोठया प्रमाणात वाढ होत. तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेटचे आजपावेतो १.३८८ ठेवीदार यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बीड येथे त्यांच्या एकूण ९५,८८,३९,४१९/ रूपये रकमेची विश्वासघात व फसवणुक झालेल्या तक्रारी व त्याबाबतचे पुरावे या शाखेत दिलेले आहेत. त्यावरून गुन्हयाचे तक्रार मधील व एकुण-१३८,४१,७६,४२२/- रूपये रकमेची फसवणुक झाले बावत माहिती आजपर्यंत प्राप्त झालेली आहे. व त्यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

ताज्या बातम्या