spot_img
8.7 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img

बीडमध्ये मुख्याध्यापक उतरले रस्त्यावर!

जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन
मुख्याध्यापकांच्या घोषणांने जिल्हाधिकारी परिसर दणाणला!
बीड : राज्यातील सर्व अशंतः अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानाचा वाढीव टप्प्याचा तातडीने शासनादेश काढून किमान एका महिन्याचा तरी पगार सर्व शिक्षकांच्या खात्यावर द्यावा, राज्यातील सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यासाठी बीड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जालिंदर पैठणे सर आणि रसाळ सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर दुपारी ३ ते ६ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील बहुतांश शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक अशंतः अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानाचा वाढीव टप्प्याचा तातडीने शासनादेश काढून किमान एका महिन्याचा तरी पगार सर्व शिक्षकांच्या खात्यावर जमा करावा तसेच राज्यातील सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यासह शाळांतील विविध शैक्षणिक समस्या संदर्भात बीड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जालिंदर पैठणे सर आणि सचिव विष्णुपंत रसाळ सर यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षणाबाबत सरकारची किती उदासिनता आहे. याबाबत उहापोह करण्यात आला. यावेळी अनेक मुख्याध्यापकांनी सरकारच्या या उदासिनत धोरणा बाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आपल्या न्याय्य आणि रास्त मागण्या मान्य करण्यासंदर्भात घोषणा दिल्या. या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसर दणाणून गेला. त्या नंतर शिष्टमंडळानेशिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना आणि शिक्षण सचिवांना देण्यात आले. या निवेदनाद्वारे प्रचलीत धोरणानुसार अनुदान टप्पा तात्काळ लागू करावा,१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व १ नोव्हेंबर २००५ नंतर अनुदानावर आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना जुनी पेंशन योजना लागु करावी, १५ मार्च २०२४ चा सुधारीत संच मान्यता शासन निर्णय रद्द करुन शाळा तेथे मुख्याध्यापक पद हे धोरण असावे,१५ मार्च २०२४ वर्ग ५ वी व ८ वी च्या वर्गाचा दर्जावाढ निर्णय तात्काळ रद्द करावा, शिक्षक कर्मचारी भरती तात्काळ करावी, राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कॅशलेस मेडिकल योजना तात्काळ लागू करावी, ०१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना जुनी पेंशन योजना लागु करावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष पैठणे सर, सचिव विष्णुपंत रसाळ सर, संस्था प्रतिनिधी संघटने प्रतिनिधी सुशीलाताई मोराळे मॅडम, जितेंद्र डोंगरे सर, मराठवाडा शिक्षक संघाचे राजकुमार कदम सर, डी. जी. तांदळे सर, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे सर, गणेश आजबे सर, शिक्षकेतर संघटनेचे श्री कळबंकर सर, युक्रांचे पंडित तुपे सर, डिंगांबर पांचाळ सर,
लक्ष्मण इंगोले सर, अनिल काळे सर, प्रदीप गाडे सर, गणेश घोडके सर, रमेश बागलाने सर, सुशीलकुमार गायकवाड सर, कानडे सर, भीमराव सावंत सर, रामहरी कदम सर, सुराज्य शिक्षक संघटनेचे पदाधिकारी दत्तात्रय चव्हाण सर, काजळे सर, विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ सर, भागवत यादव सर, सुरेश कदम सर, प्रकाश कदम सर, गणेश गुजर, सय्यद सर, पि के कदम सर, एम पी शिरसाट सर, पांचाळ सर, सावंत सर, फपाळ सर, डोंगरदिवे सर, हाके सर, गरड सर, मेहेत्रे सर, वक्ते सर, मंदे सर, शर्मा सर, यांच्यासह
विविध शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

ताज्या बातम्या