spot_img
8.7 C
New York
Wednesday, January 7, 2026

Buy now

spot_img

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहा- कचकलवार

बीड : समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा दि. १८.०८.२०२४ रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व पत्रकार बांधवांनी होणार्‍या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे युवा ग्रामीण पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी सांगितले.
अतिशय कमी कालावधीत पूर्ण महाराष्ट्र भरात जिल्हा, तालुका व सर्कल नुसार आज युवा ग्रामीण पत्रकार संघ स्थापन करून जिथे छोट्या – मोठ्या, ग्रामीण आणी शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळा दर्जा मिळत असल्याने त्यांनी जि संकल्पना करून पूर्ण महाराष्ट्र भरात कुठल्याही लहान मोठ्यांचा भेद नं करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा जो विडा उचलेला आहे त्यास आज खरोखरच महाराष्ट्रात यश मिळाले आणी याचे खरे कारण म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला सर्वतोपारी मदत होत असल्याने या संघटने मध्ये राष्ट्रभरातून पत्रकार जुळलेले आहेत आणी एवढेच नव्हे तर भविष्यात पूर्ण भारतभर युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या