spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

अखेर जवानाची झुंज सपली ; पत्नीने पाजले होते विष

कोल्हापूर : हातपाय बांधून विष पाजण्यात आलेल्या जवानाचा अखेर मृत्यू झाला आहे. पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराने मिळून हे धक्कादायक कृत्य केले होते. जवानाच्या मृत्यूनंतर आता पत्नी आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या जवानाचे नाव अमर देसाई असे असून गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार जवान अमर देसाई यांच्यावर १८ जुलै रोजी झोपेत असताना विषप्रयोग झाला होता. झोपत असतानाच त्यांचे हात-पाय बांधण्यात आले होते. विषप्रयोगाची ही घटना समजताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते.
त्यांचे प्राण वाचवण्याचा डॉक्टरांनी अटोकाट प्रयत्न केला. पण ते औषधांना प्रतिसाद देत नव्हते. शेवटी उपचार चालू असताना १५ दिवसांनी त्यांची मृत्यूशी झुंज संपली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर कोल्हापुरात खळबळ उडाली होती. पत्नीनेच आपल्या प्रियकाराला सोबत घेऊन जवान अमर देसाई यांना विष पाजले होते.
मिळालेल्या माहितीनुसार देसाई यांच्यावर त्यांच्याच पत्नीने विषप्रयोग गेला. या घटनेची माहिती शेजारच्यांना समजली. त्यानंतर शेजार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला आणि त्यांना थेट रुग्णालयात दाखल खेलं. त्यांच्यावर पुण्याच्या रुग्णालयात उपचार चालू होते. पण त्यांचा अखेर मृत्यू झाला. या घटेनंतर विषप्रयोग करणार्‍या पत्नीच्या साथीदारांचा शोध चालू करण्यात आला होता. अमर देसाई हे लष्करात जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या अशा प्रकारच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या