बीड : आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाता परिसरात अति मुसलधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष सावध राहणे आवश्यक आहे.
खूपच अति आवश्यक काम असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. विदर्भातील सर्वच्या सर्व ११ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच संपूर्ण खानदेश म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज घेण्यात आला आहे.