spot_img
5.5 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img

सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या ; तब्बल 12 वाहने केली जप्त

जप्तीची कारवाई अजूनही सुरूच!
जालना : ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुठे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे .
बीड येथील कारागृहातून जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुटे आणि पाटोदेकर यांना ताब्यात घेतले होते आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना उद्या दिनांक 30 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. ही पोलीस कोठडी फक्त जालना शहरात सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एकाच गुन्ह्याच्या संदर्भात मागितलेली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आजपर्यंत 1200 गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदविल्या आहेत आणि ही रक्कम सुमारे 64 कोटींच्या जवळपास आहे. न्यायालयाने दिलेल्या कोठडीनंतर तपासी अधिकार्‍यांनी कोठडी दरम्यान या दोन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधीक्षक रमेश जायभाये आणि या प्रकरणाचे तपासी अधिकारी गणेश सुरवसे यांच्या हाती बरीच माहिती लागली. या माहितीच्या अनुषंगाने या अधिकार्‍यांनी बीड आणि तिसगाव येथून काही मालवाहू वाहने जप्त केली आहेत. सध्या जप्त केलेली ही बारा वाहने आर्थिक गुन्हे शाखेच्या परिसरामध्ये उभी आहेत आणि यांची अंदाजे किंमत चार ते सहा कोटी पर्यंत जाते. कारण यामधील बहुतांश वाहने हे दुग्धजन्य पदार्थाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात होती त्यामुळे ती वातानुकूलित आहेत. तिरूमला ऑइल आणि गुड मॉर्निंगजी या दोन उत्पादनांच्या वाहतुकीसाठी ही वाहने वापरली जात होती. दरम्यान अजूनही काही ठिकाणी पोलिसांची जप्तीची कारवाई सुरूच आहे. विशेष म्हणजे ही सर्व वाहने एम एच 23 ए. यु.या मालिकेची आहेत आणि बहुतांश वाहनांवर संकटमोचन असलेल्या हनुमानाचे जय भद्रा असे नाव टाकलेले आहे. हा सर्व तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत आणि कुटेंची मालमत्ता जप्त करण्यासाठी जालना शाखेने सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्या