माजलगाव : दिंद्रुड प्रकरणी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने तहसीलसमोर सोमवार (दि.22) उपोषण करण्यात आले.
दिंदूड प्रकरणी 60 ते 70 नागरिकावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले तात्काळ मागे घेण्यात यावे दिंद्रड नागरिकावर खोटे गुन्हा दाखल करणार्या माजलगाव पोलीस निरीक्षक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करणे राजकीय दबाव खाली मुस्लिम समाजाच्या विरुद्ध आदेश देऊन अंत्यसंस्कार अडथळा निर्माण करणार्या तहसीलदार व संबंधित अधिकारी वर गुन्हा दाखल करून निलंबित करणे दिंद्रुड येथील पोलीस निरीक्षक यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करणे दिंद्रुड येथील ग्रामसेवक व तलाठी यांची चौकशी करण्यात यावी दिंद्रुड येथील कब्रस्तान साठी सरक्षण भिंत किंवा कंपाउंड चे बांधकाम करणे या प्रमुख मागण्यासाठी माजलगाव तहसील येथे प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आले.