भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेचा दाैरा करणार आहे. ज्यामध्ये टीम इंडियाला 3 टी20 तर 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. ज्याची सुरुवात 27 जुलै पासून होणार आहे. तर या दाैऱ्यासाठी बीसीसीआयने काल (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा केली.
ज्यामध्ये बीसीसीआयकडून अनेक आश्चर्यचकित निर्णय घेण्यात आले आहेत. वास्तविक, बीसीसीआयने टॅलेंट असणाऱ्या खेळाडूंकडे पाठफिरवल्याचे दिसत आहे. चला तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात अश्या 5 खेळाडूंना ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान मिळायला पाहिजे होते.
ऋतुराज गायकवाड
भारताचा वरच्या फळीतील फलंदाज म्हणून ऋतुराज गायकवाडकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पुण्याच्या या फलंदाजाचे टी-20 फॉरमॅटमध्ये खूप शानदार रेकॉर्ड आहे. त्याने 39.56 च्या सरासरीने आणि 143.53 च्या स्ट्राईक रेटने एकूण 633 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून आपले कौशल्य दाखवण्यातही तो यशस्वी ठरला होता, पण तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष झाले.
मुकेश कुमार
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारची नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात कामगिरी चांगलीच होती. हरारे येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांत त्याने एकूण आठ बळी घेतले. असे असतानाही त्याची संघात निवड झाली नाही. खलील अहमदसारख्या खेळाडूच्या पुनरागमनामुळे त्याला संघात स्थान मिळालेले नाही.
अभिषेक शर्मा
नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामातील उत्कृष्ट कामगिरीनंतर, अभिषेक शर्माला अखेरीस पहिला भारतीय संघ आला आणि त्याने हरारेमध्ये चांगली कामगिरी केली. पदार्पणाच्या सामन्यात चार चेंडूंत शून्यावर बाद होऊनही तो पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. पुढच्या सामन्यात त्याने अवघ्या 48 चेंडूत शानदार शतक झळकावले. यानंतर यशस्वी जयस्वालच्या पुनरागमनामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागले. आता त्याची श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली नाही.
संजू सॅमसन
संजू सॅमसन हा एक असा खेळाडू आहे जो संघात आणि बाहेर फिरत राहतो. कधी त्याला काढून टाकले जाते तर कधी त्याला परत बोलावले जाते. सॅमसनची श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवड झाली असली तरी त्याला वनडे संघात स्थान मिळाले नाही. सॅमसनने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत शतक झळकावले होते. त्यानंतर त्याची वनडेत निवड झाली नाही.
युझवेंद्र चहल
टी-20मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा युझवेंद्र चहल पुन्हा एकदा दुर्लक्षित झाला. तो टी20 विश्वचषक संघात होता, पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता त्याची श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली नाही. चहलच्या नावावर 80 सामन्यांमध्ये 96 विकेट आहेत.