spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! महसूल विभागाने घेतला मोठा निर्णय

ग्रामीण भागातील नागरीक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांची दाखले मिळविण्‍यासाठी होणारी अडचण दुर करण्‍यासाठी महसूल प्रशासनाने अव्‍वल कारकुन व मंडल आधिकारी यांनाच आता प्रतिज्ञापत्रावर स्‍वाक्षरी करण्‍याचे आधिकार दिले आहेत.

 

महाविद्यालयीन प्रवेश व इतर कारणांसाठी आवश्‍यक असलेले दाखले तसेच प्रतिज्ञापत्र काढून घेण्‍यासाठी महसूल कार्यालयात सध्‍या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा ताणही सध्‍या प्रशासनावर असल्‍याने नागरीकांची गैरसोय

व विद्यार्थ्‍यांचे हाल होवू नयेत म्‍हणून महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रशासनाला स्‍थानिक पातळीवरच निर्णय करुन, नागरीक व विद्यार्थ्‍यांना दिलासा देण्‍याबाबत उपाय योजना करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या होत्‍या.

संगमनेर तहसील कार्यालयाने तातडीने कार्यवाही करुन, अव्‍वल कारकून व मंडल आधिकारी यांनाच आता प्रतिज्ञापत्रावर स्‍वाक्षरी करण्‍याचे आधिकारी दिले आहेत. आठवड्यातील कार्यालयीन वेळेच्‍या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून प्रतिज्ञापत्र स्‍वाक्षरीचे कामकाज तसेच

मंडल आधिका-यांनी कार्यालयीन वेळेच्‍या दिवशी आपल्‍या कार्यक्षेत्रातील प्रतिज्ञापत्रातील स्‍वाक्षरी करण्‍याचे कामकाज पाहण्‍याचे आदेश तहसीलदार धिरज मांजरे यांनी तातडीने निर्गमीत केल्‍याने या निर्णयाचा मोठा दिलासा आता ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्‍यांना मिळाला आहे.

ताज्या बातम्या