या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता|
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
कोल्हापूरात साक्षात श्री महालक्ष्मी स्वरूपात आणि साक्षात दख्खन चे राजा श्री ज्योतिबा स्वरूपात निवास करणार्या परमपूज्य श्री माताजी यांच्या श्री चरण स्पर्शाने आर्शिवादीत झालेले वारणानगर हे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वारणा नदीच्या काठी वसलेले एक प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि सहकारी केंद्र आहे,
परमपूज्य श्री आदिशक्ती माताजी निर्मलादेवी यांचे आशीर्वादाने कोडोली,तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे कुंडलिनी शक्तिची जागृती व आत्मसाक्षात्कार हा कार्यक्रम दिनांक ५ॅ एप्रिल २ॅ०ॅ२ॅ६ॅ वार रविवार आयोजित करण्यात आला आहे.
कलियुगाचे वर्णन गोंधळाचे युग असे केले आहे. त्यामुळे वस्तू, वस्तू, नातेसंबंध इत्यादींप्रमाणेच धर्म आणि धार्मिकतेतील गैरसमज आणि शंका यांचा समावेश सर्वत्र दिसून येतो आणि एकाच निर्मात्याने निर्माण केलेली सृष्टी वेगवेगळ्या आवरणाखाली गुंडाळलेली दिसते. जो वेगवेगळ्या मार्गातून आलेल्या सत्याच्या साधकांना त्याच्या मूळ शाश्वत सत्याची आणि तेही सत्यतेची ओळख करून देतो. ज्याप्रमाणे हिमालयातील एकाच उगमातून अनेक नद्या उगम पावतात, ज्यांचा मार्ग, व्याप्ती, रंग आणि पाण्याचे स्वरूप भिन्न आहे.पण शेवटी सर्व काही महासागरात मिसळून पुन्हा बाष्पीभवन होऊन स्वतःच्या स्रोताचे माध्यम बनते. सहज हा समुद्र आहे जिथे मतभेद संपतात. आणि तुमचा सर्वोच्च शक्तीशी थेट संबंध प्रस्थापित होतो. त्यामुळे सर्व समावेशक पद्धतीने चालण्याचा मार्ग श्री माताजींनीने सर्व जगाला दिला आहे . त्याच मार्गाने चालण्यासाठी आणि श्री माताजींचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आपण जास्तीत सहजयोगचा प्रचार प्रसार केला पाहीजे . त्याच निमित्ताने यशवंत क्रीडा संकुल, दत्तमठी, कोडोली-वारणानगर तालुका पन्हाळा,जिल्हा. कोल्हापूर येथे प्रचार प्रसार ३ एप्रिल २०२६ ते ५ एप्रिल २०२६ या दिवशी करण्यात येणार आहे. तर दिनांक ४ एप्रिल २०२६ वार शनिवार सायंकाळी ७ वाजता सहजयोगातील संगीत प्रोग्राम होणार आहे.
बाहेरून येणार्या साधकांसाठी २ एप्रिल २०२६ गुरूवार सायंकाळ पासून व्यवस्था कोडोली गावात आहे. कोडोलो बसस्थानका शेजारी, सर्वोदय विविध कार्यकारी सहकारी सोसायटि हॉल गरुड चौक, कोडोली-वारणानगर तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर,करण्यात आली आहे.
अधिक माहिती साठी संपर्क -आनंद मोहीते-९८६०४४४३१९, सुरेश मोहीते-९१५६९९५१८२,
राजाराम मेथे- ८८५५९३०९२४
दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी साडेसहा वाजता मेगा रॅली व संध्याकाळी ७ वाजता आत्मसाक्षात्कार सोहळा संपन्न होईल. कोडोली-वारणानगर येथे येण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन कोल्हापूर आहे . कोल्हापूर ते कोडोली ३२ कि.मी.आहे , तसेच महाराष्ट्रामधून येणार्या प्रायव्हेट गाड्या, कार, महामंडळाच्या बस कोल्हापूर सिटी मध्ये , जाण्याऐवजी हायवेवर किनीवठार , या स्टॉपवर उतरणे आणि तेथून जाणारे शेअरिंग रिक्षा, बस, टॅक्सी या कोडोली-वारणानगर करता उपलब्ध आहे . किनीवठार ते वारणानगर अंतर ८ कि.मी.आहे.
एस टी सेवा, कोल्हापूर ते कोडोली-वारणानगर,ला ही बस सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रत्येकी अर्धा तासाने बस उपलब्ध आहे . रेल्वे स्टेशन ते सीबीएस बसस्थानक अंतर १० मिनीटाच्या अंतरावर आहे.
तरी जास्त जास्त साधकांनी या प्रचार प्रसाराचा लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग प्रचार- प्रसार परिवार, महाराष्ट्र कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

