spot_img
1.7 C
New York
Friday, March 13, 2026

Buy now

spot_img

“कृषीकुंभ २०२६” भव्य जिल्हा कृषि महोत्सव

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक

नाशिक जिल्हा प्रशासन, कृषि विभाग आणि आत्मा (ATMA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कृषीकुंभ २०२६” या भव्य जिल्हा कृषि महोत्सवाचे आज दि. १२/०३/२०२६ रोजी उदघाटन करण्यात आले.

प्रदर्शनास भेट देण्यासाठी जायगाव गावातून बसची व्यवस्था करण्यात आलेली होती.गावातील ग्रामस्थ,शेतकरी महिला व बचत गट यांनी सदर कृषी कुंभ चा लाभ घेतला व  प्रदर्शनात विविध स्टोल मांडण्यात आलेले होते त्यांना भेटी देऊन व माहिती समजून घेऊन उपस्थित शेतकऱ्यांनी त्या बाबत आनंद ही व्यक्त केला. शेतीतील नवं नवीन आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवीन पिक पद्धती,कृषी यंत्र औजारे,विविध शासकीय योजणांची माहिती  तसेच विविध तालुक्यातून फळे, भाजीपाला, व इतर परदेशी भाजीपाला यांचे उत्पादनाचे live sample तसेच कृषी विभागाच्या विविध योजना अंतर्गत येणारे शेततळे, अस्तरीकरण, कांदाचाळ, शेडनेट हाऊस यांचे मॉडेल शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी ठेवण्यात आलेले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना घेऊन त्याच बसमधून शेतकऱ्यांना परत गावी नेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती, बस ने आण बाबत ची संपूर्ण जबाबदारी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी व उप कृषी अधिकारी यांना देण्यात आली होती.कृषी कुंभ च्या नियोजन बद्ध भेटीला शेतकरी यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.हा कृषी कुंभ १२ ते १६ मार्च पर्यंत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी कुंभ स भेट द्यावी असे आव्हान कृषी विभागा मार्फत करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या