ज्ञानेश्वर काकड | नाशिक
श्री संत भगवान बाबा स्मृती सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह (वर्ष ९ वे) सिन्नर आडवा फाटा येथे दि. २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या भव्य नामयज्ञ सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपली कीर्तन व प्रवचन सेवा अर्पण करत भाविकांना अध्यात्मिक मेजवानी दिली.या सप्ताहात ह.भ.प. भागवत महाराज शास्त्री, ह.भ.प. प्रमोदजी महाराज जगताप, ह.भ.प. उत्तम महाराज बडे, ह.भ.प. तनवीताई श्रीकांत आंधळे (विश्व हिंदू रक्षा संघटना, नाशिक जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष), ह.भ.प. सोनालीताई फडके, ह.भ.प. नामदेव महाराज (गेवराई), ह.भ.प. नामदेव महाराज पोफळे तसेच महंत आईसाहेब राधाताई सानप (मिराबाई संस्थान, महासांगवी, पाटोदा, बीड) यांच्या अधिकारपूर्ण वाणीतून कीर्तनसेवा संपन्न झाली. सप्ताहाची सांगता आईसाहेब राधाताई सानप यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.कीर्तनातून सामाजिक एकतेचा आणि हिंदू धर्मासाठी एकत्रित कार्य करण्याचा संदेश देत “आठरा पगड जातींनी एकत्र येणे हाच खरा काला आहे,” अशी प्रभावी शिकवण आईसाहेबांनी दिली.या नामयज्ञात वृक्षमित्र फाउंडेशनचे संचालक विष्णू वाघ यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दररोज एक वृक्ष भेट देण्याचा उपक्रम राबवला. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” हा संतविचार प्रत्यक्ष कृतीतून साकार करत त्यांनी पर्यावरण रक्षणाची प्रेरणा दिली.कार्यक्रमाला कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. खासदार राजाभाऊ वाजे, उदयभाऊ सांगळे, संजय सानप (चिंचोली), सुदाम बोडके (मोह) सुदाम बोडके (जामगांव),पत्रकार ज्ञानेश्वर काकड(जायगाव), गोविंद दिघोळे, शरद दिघोळे,मीरा सानप, विनायकराव शेळके, कृषी बाजार उत्पन्न समितीचे संचालक रवींद्र विनायकराव शेळके, सुरेश बरके, पीएसआय विलासराव सानप, बंडू नाना भाबड, सजन सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.सिन्नर तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक अनिलभाऊ सरवार, आशाताई करपे, शुभम दादा वारंगसे, पगार आजी यांनीही मोलाचे सहकार्य केले. तसेच सिन्नरमधील नामवंत रुग्णालये व डॉक्टरांनीही योगदान दिले. सुमन हॉस्पिटल (डॉ. सुनील), स्पर्श हॉस्पिटल (डॉ. अंकुश आव्हाड), मातोश्री हॉस्पिटल (गणेश सांगळे), डॉ. दीपक आव्हाड, यशवंत हॉस्पिटल (डॉ. संदीप मोरे), आशीर्वाद हॉस्पिटल (डॉ. अविनाश आंधळे व प्रतिभाताई आंधळे) यांचे सहकार्य लाभले. स्वप्निल अहिरराव यांचेही विशेष योगदान राहिले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी भवन महिला भजनी मंडळ तसेच ह.भ.प. कवयित्री सुनीताई वाळुंज यांनी हरिपाठाचे सौजन्य घेतले. चैतन्य वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था, मेंढीचे ह.भ.प. राहुलजी महाराज डुंबरे यांचे सहकार्य लाभले. तसेच ह.भ.प. अनंतजी उगले, अनिल उगले, विलास सांगळे, दौलत केकान, ज्ञानेश्वर दिघोळे, दिलीप गीते यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.सप्ताहादरम्यान सिन्नर पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी कीर्तनश्रवण व महाप्रसादाचा लाभ घेतला.शेवटी, श्री संत भगवान बाबा वारकरी सेवा समिती सिन्नर यांच्या वतीने सप्ताहासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व भाविक भक्तांचे व योगदान दिलेल्या सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.अशा भक्तिमय आणि सामाजिक ऐक्याच्या संदेशाने परिपूर्ण या अखंड हरिनाम सप्ताहाने सिन्नर परिसरात अध्यात्मिक उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण केली.

