spot_img
2.1 C
New York
Sunday, March 1, 2026

Buy now

spot_img

गोपाळ समाजाने मानाच्या होळीनिमित्त श्री क्षेत्र मढी येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हा


रामराजे गव्हाणे यांचे आवाहन
वडवणी : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाणार्‍या श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांची यात्रा आणि ४५० वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेली श्रीक्षेत्र मढी येथील गावाची होळी कानिफनाथांच्या जयघोषात दिनांक २ मार्च वार सोमवार रोजी असुन राज्यातील विविध भागात असलेल्या हजारो नाथभक्त व समस्त गोपाळ समाजाने मानाच्या होळीसाठी व दर्शनासाठी उपस्थित राहावे असे रामराजे गव्हाणे यांनी म्हटले आहे
भारतातील सर्व गोपाळ समाज बांधवांना कळकळीचे आवाहन करण्यात येते की गोपाळ समाजाला श्री चैतन्य कानिफनाथ मढी गड येथे मानाच्या आणि शेणाच्या पाच गौर्‍या पेटवण्याचा मान हजारो वर्षापूर्वी गडावरील पंच कमिटी यांनी दिलेला आहे कारण गोपाळ समाजाचं आराध्य दैवत असलेल्या चैतन्य कानिफनाथ महाराज गड बांधण्यासाठी गोपाळ समाजाच्या पूर्वजांनी फार मोठी मेहनत घेतली आहे त्यांच्या मेहनतीमुळे आज समाजाला कानिफनाथ गडावर सगळ्यात मोठा मान मिळालेला आहे तसेच बरेचसे आडनाव हे कानिफनाथ महाराज गडासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या योगदानाहून त्यांचे आडनाव पडलेले आहेत तसेच चार भाऊ मानदार चार भाऊ वतनदार यांना तो मान दिलेला होता पाथर्डी येथील न्यायालय न्यायाधीश यांच्या आदेशानुसार समाजातील लोणारे्. माळी. कालापाड्. नवघरे. हबरे. व गिर्‍हे. या आडनावाची सहा समाज बांधव ही होळी चे मानकरी म्हणून समाजाच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या होळीच्या दिवशी श्री चैतन्य कानिफनाथ गड येथे येऊन समाजाची मानाची होळी पेटवतात.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सर्व समाज बांधवांना एकत्र करून समाजाची एकजूट दाखवण्याचा समाज बांधवांनी प्रयत्न केला पाहिजे त्या प्रयत्नाला अनुसरून सर्व गोपाळ समाज बांधवांना विनंती करण्यात येते की यावर्षी आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ समाजासाठी खर्च करून एक दिवस मानाच्या होळीनिमित्त आपल्या चैतन्य कानिफनाथ गडावर मोठ्या संख्येने येऊन सहभागी व्हावे असे आव्हान देवडी येथील गोपाळ समाजाचे युवा नेते रामराजे गव्हाणे यांनी केले आहे .,

ताज्या बातम्या