spot_img
0.9 C
New York
Saturday, February 28, 2026

Buy now

spot_img

दहेगाव कुंभा येथे शेकडो साधकांनी घेतला आत्मसाक्षात्कार

बैलगाडीतुन श्री माताजींची मिरवणूक काढून प्रचार प्रसार
सहजयोग्यांद्वारे कार्यक्रमाचे भव्य आयोजन
तुषार सोलोडे | अमरावती


प.पू. श्री माताजी निर्मला देवी यांच्या परमकृपेत सहजयोग प्रचार प्रसार व आत्म साक्षात्कार कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन ग्राम दहेगाव कुंभा, ताः राळेगाव, जिल्हा: यवतमाळ येथे करण्यात आले होते. या ठिकाणी प्रचार प्रसारासाठी कुंभा मारेगाव, दहेगाव, वणी, राळेगाव, हिंगणघाट, यवतमाळ येथून मोठ्या प्रमाणात सहजयोगी सहभागी झालेले होते. या प्रसंगी गावातून श्री माताजींची ढोल ताशांच्या गजरात बैलगाडीतुन भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. संपूर्ण गावात चैतन्यमय वातावरणात प्रचार करण्यात आला. या प्रसंगी सहज योग्यांमधे एक वेगळाच उत्साह अनुभवास आला. सायंकाळी उपस्थित साधकांना श्री शरददादा पाथरडकर, हिंगनघाट यांनी सहजयोगाचे जिवनात असलेले महत्व व जिवनात सहज योगापासुन मिळणारे फायदे याचे महत्व समजावून सांगितले तसेच उपस्थित साधकांनी प.पू. श्री माताजींच्या कृपार्शिवादने कुण्डलिनी शक्तीच्या जागृती द्वारे परमेश्वराच्या दिव्य शक्तीचा अनुभव घेवून असीम शांतीचा अनुभव घेतला. या कार्यक्रमात सुंदर असे मार्गदर्शन श्री शरददादा यांचे लाभले. तसेच या कार्यकमाच्या यशश्वीतेसाठी श्री माताजींच्या परम कृपेत कुंभा मारेगाव दहेगाव वणी राळेगाव हिंगणघाट यवतमाळ येथील सर्व सहज योगी बंधुंनी परिश्रम घेतले. या सर्व कार्यक्रमाचे श्रेय श्री माताजींच्या श्री चरणी अर्पित करून श्री माताजींचे श्री चरणी कोटी कोटी धन्यवाद.

 

ताज्या बातम्या