वडवणी : तालुक्यातील चिंचाळा येथील अशोक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.आनंद काळे व प्रमुख पाहुणे माजी सभापती बळीराम आजबे होते.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सावंत बि.आर. उपस्थित होते .गावातील ज्येष्ठ नागरिक गावचे सरपंच पती सुभाषराव आजबे तसेच चेअरमन श्रीपती कोळपे गावातील ग्रामपंचायत सर्व मेंबर प्रदीप पांढरे व सेवा सहकारी सोसायटीचे सर्व मेंबर उपस्थित होते या कार्यक्रमाची विद्यार्थी ,विद्यार्थिनी विविध भाषणे दिली व देशभक्तीपर गीत गायले .कार्यक्रमात वर्षभर उपक्रमात प्रवीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

.अध्यक्ष आनंद काळे व पंचायत समितीचे माजी सभापती श्री बळीराम बापू आजबे , मुख्याध्यापक श्री. सावंत सर, श्री .सचिन सलगर सर ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पांडरे व चेअरमन श्रीपती नाना कोळपे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .आवारे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री .कोळपे सर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक प्रमुख श्रीमती.सावंत मॅडम व आवरे सर यांनी केले.

