spot_img
6.5 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img

कोट्यावधीची फसवणूक करणार्‍या सौरभ कुलकर्णीला ७ दिवसांची पोलिस कोठडी

बीड : वैद्यकीय शिक्षणातील मॅनेजमेंट कोट्यातून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह गुजरात, चंदीगड, पंजाब तसेच इतर राज्यांतील अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या महाठक सौरभ कुलकर्णी याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सौरभ कुलकर्णी याला धारूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना तसेच डॉक्टरांना उच्च व पदव्युत्तर शिक्षणासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे भासवून आरोपीने महाराष्ट्रासह विविध राज्यांतील विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी केज विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सय्यद कराडकर, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार व अनिल मंदे यांच्या पथकाने दि. १३ जानेवारी रोजी कराड येथून सौरभ कुलकर्णी याला अटक केली होती.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी पीडितांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताज्या बातम्या