spot_img
6.3 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img

बालपणीचा वाद विशालने केलं हर्षदला बाद

बीड शहरातील अंकुशनगर भागात नगरपालिका कंत्राटी कर्मचारी हर्षद शिंदे वय-३८ वर्षे याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांना या हत्त्ये मागच्या कारणाचा शोध घेण्यात यश आले आहे. आरोपी विशाल सूर्यवंशी आता पोलिस कोठडीत आहे. या घटनेमागचं कारण ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. लहानपणी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी आपण हर्षदचा काटा काढल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.
अंकुशनगर भागात हर्षद शिंदेची मंगळवारी (६ जानेवारी) रोजी विशाल सूर्यवंशी या तरुणाने निर्घृण हत्या केली होती. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर आरोपी विशाल सूर्यवंशी याला शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रविवारी (११ जानेवारी) ताब्यात घेतले. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस तपासातून हर्षद शिंदेच्या हत्याकांडामागचे खरे कारण समोर आले आहे. लहानपणीच्या भांडणांचा राग मनात साठल्यामुळे आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी दिली आहे.विशाल सूर्यवंशीने हर्षदला जीवे मारण्यामागे लहानपणीचे भांडणे कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. लहानपणीच्या भांडणाचा राग मनात ठेवून तब्बल १५ ते २० वर्षानंतर त्याचा बदला घेण्यासाठी आरोपीने एवढे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येते.हर्षदला घरासमोर काम करताना पाहिल्यानंतर त्याला बालपणीच्या भांडणाची आठवण झाली. जुन्या आठवणी नशेत ताज्या झाल्यानंतर त्याने पिस्टल सोबत घेत हर्षदवर आधी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्यामुळे त्याचा पाठलाग करून खून केला

ताज्या बातम्या