spot_img
1.3 C
New York
Tuesday, January 13, 2026

Buy now

spot_img

कान्होबा तांड्याच्या विराट राठोडची विराट खेळी

बीड  : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्होबा तांडा (लक्ष्मी आई तांडा) केंद्र नाळवंडी ता . बीड येथील शाळेचा विद्यार्थी विराट व्यंकट राठोड याने लांब उडी लहान गट यामध्ये बीड तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावला .
सविस्तर माहिती अशी की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्होबा तांडा ही शाळा छोटयाशा वस्तीत असून येथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता खूप चांगली आहे . दि . १३ – ०१ – २०२६ रोजी घेण्यात आलेल्या बीड तालुकास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये या शाळेतील विद्यार्थी चि . विराट व्यंकट राठोड याने लहान गटातून लांब उडी या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला .
त्याचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक श्री . रोहिदास गंपू राठोड सर, केंद्रिय शाळेचे मुख्याध्यापक श्री . विक्रम ( बापू ) राऊत सर, केंद्रप्रमुख विमल चौरे मॅडम, शाळेचे मार्गदर्शक शिक्षक श्री . उत्तरेश्वर रोडे सर, पंच श्री . सोमिनाथ तांदळे सर तसेच सरपंच स्वरूपराव राठोड , बंडा शेठ राठोड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री . भारत चव्हाण, उपाध्यक्ष श्री . गोरख चव्हाण, श्री . राजेंद्र चव्हाण, लहू चव्हाण, कोंडिराम चव्हाण, श्री . राजू चव्हाण, भिमा चव्हाण यांनी अभिनंद केले .

ताज्या बातम्या