वडवणी : तालुक्यातील चिंचाळा येथील अशोक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मॉंसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती सोमवार दि.१२ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री सावंत सर व प्रमुख पाहुणे श्री काळे सर व पटाईत सर होते श्र कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी जिजाऊ वंदना श्रीमती सावंत मॅडम यांनी म्हटली यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी जिजाऊंची वेशभूषा केली होती या निमित्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन गटांमध्ये भाषण स्पर्धा ठेवण्यात आली होती पाच ते सात एक गट व आठ ते दहा एक गट यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अध्यक्षीय समारोपप्रसंगी श्री सावंत सरांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्या कार्याची माहिती दिली तसेच मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आवारे सरांनी केले व आभार व्यक्त श्री बडे सरांनी केले.

