spot_img
3.2 C
New York
Wednesday, January 7, 2026

Buy now

spot_img

देवडी फाटा जि.प.शाळेस प्रोजेक्टर भेट

माजी विद्यार्थी संघ मेळावा 
वडवणी : तालुक्यातील देवडी येथील *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडी फाटा* येथे थोर समाजसुधारिका व पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे *माजी विद्यार्थी संघ मेळावा आणि मेळाव्यात माजी विद्यार्थी तसेच आदर्श मॉल बीड चे संचालक श्री एकनाथ झाटे व गावकऱ्यांनी शाळेस प्रोजेक्टरची दिलेली भेट*
यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर भाषणे, कविता व विचार मांडले. शिक्षकांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे *माजी विद्यार्थी संघ मेळावा आणि मेळाव्यात माजी विद्यार्थी तसेच आदर्श मॉल बीड चे संचालक श्री एकनाथ झाटे व गावकऱ्यांनी शाळेस प्रोजेक्टरची दिलेली भेट* . या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाला चालना मिळणार असून विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अधिक प्रभावी बदल घडून येणार आहे. गावकऱ्यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
शाळेच्या वतीने गावकऱ्यांचे आभार मानण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या