पुणे : जगद्गुरू श्री रविदास महाराज मंदिर तिसरे धर्मस्थान, कात्रज पुणे येथे २२ वॉं स्थापन दिन समारोह शुक्रवार ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भक्तांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष : अ.भा.रविदासिया धर्म संगठन, संस्थापक तिसरे धर्मस्थान निमंत्रक श्री सुखदेवजी महाराज यांनी केले आहे .
जगद्गुरू श्री रविदास महाराज मंदिर येथे हा सोहळा होणार आहे. शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी अमृतवाणी पाठ, सकाळी १० ते २ पर्यंत अखिल भारतीय रविदासिया धर्म संगठन बैठक आणि चर्चा सत्र , दुपारी ३ ते ६ या वेळेत सद्गुरू रविदास महाराज अमृतवाणी पाठशाला कार्यक्रम, ६ वाजता अमृतवाणी, ७ वाजता अमृतवारी आणि भजन संध्या होईल. त्यानंतर दिनांक ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रध्दांजली कार्यक्रम, ३ ते ४ या वेळेत रविदासिया धर्मा विषयी राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवजी महाराज मार्गदर्शन करतील. तर रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी श्री गुरू रविदास महाराज चरण पादुका पुजन होईल. त्यानंतर सकाळी ८ ते ११ या वेळेत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा कात्रज चौक ते तिसरे धर्मस्थान मंदिर पर्यंत निघेल. ११ ते २ या वेळेत सत्संग प्रवचन होईल . सायंकाळी ६ वाजता अमृतवारी घेण्यात येणार आहे. य कार्यक्रमात आशीर्वाद आणि प्रमुख उपस्थिती प.प.पीठाधीश, धर्मगुरू १०८ संत श्री निरंजनदास जी महाराज (पंजाब) , चेअरमन अखिल भारतीय रविदासिया धर्म संगठन , भारत यांची राहणार आहे. हा कार्यक्रम जगद्गुरू श्री रविदास महाराज मंदिर तिसरे धर्मस्थान कात्रज-कोंढवा रोड,कात्रज पुणे-४११०४६ येथे होणार आहे . कार्यक्रमाचे संयोजक गुरू रविदास जन्मथान पब्लिक चेरिटेबल ट्रस्ट (उत्तर प्रदेश), तिसरे धर्मस्थान, सेवादार कमेटी तथा, श्री.सुखदेव जी महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष) अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन भारत.
तर गुरूंचा महाप्रसाद लंगर नंतर सुरू राहणार आहे . तरी या समारोह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष : अ.भा.रविदासिया धर्म संगठन, संस्थापक तिसरे धर्मस्थान निमंत्रक श्री सुखदेवजी महाराज यांनी केले आहे .

