spot_img
8.4 C
New York
Saturday, November 22, 2025

Buy now

spot_img

शिव पाणंदकडून महसुलमंत्र्यांचा सन्मान म्हणजे शेतकर्‍यांचा आशिर्वाद-शरद पवळे

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
नारायणगव्हाण-राळेगणसिद्धी रोडवरून सुरू झालेली ‘शिव पाणंद’ चळवळ महाराष्ट्रभर पसरली असून आज हजारो शेतरस्ते खुल्या झाल्या आहेत.पारनेर तालुका सामाजिक योगदान आणि राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी देशात अग्रगण्य ठरलेला असून, याच तालुक्यात पुन्हा ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळ’ उभी राहिली. राज्यातील विविध तालुका आणि जिल्ह्यांमध्ये चळवळ पोहचली असून हजारो शेतकरी या उपक्रमातून लाभान्वित होत आहेत. राज्यातील अनेक बिटीश कालिन शिवरस्ते खुले होत असुन कोणालाही न सुचलेला विषय एक देशाला आदर्श होत आहे
माझे स्वप्न साकार होत आहे. सरकार, प्रशासन आणि चळवळीचे पदाधिकारी समन्वय साधत शेतकर्‍यांना न्याय देत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत, पण शेवटच्या शेतकर्‍याला दर्जेदार रस्ता देण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार. महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय: शेत रस्ते आणि पाणंद रस्ते १२ फूट रुंद महायुती सरकारने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे आणि सीमांकन करणे यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. निर्णय दिनांक: २२ मे २०२५ मुख्य वैशिष्ट्ये: रस्त्याची रुंदी: १२ फूट नोंदणी: ७/१२ उतार्‍यावर अंमलबजावणीची वेळ: तहसीलदारांनी सात दिवसांत आदेश पूर्ण करणे बंधनकारक प्रक्रिया: स्थळ पाहणी, पंचनामा आणि जीओ-टॅग छायाचित्रांद्वारे पडताळणी मोफत पोलीस संरक्षण: अतिक्रमण काढण्यासाठी शासनाने दिले शेतरस्त्यासाठी मरूम दगडासाठी रॉयल्टी माफ ९० दिवसांच्या आत रस्ता
उद्देश: शेत-रस्त्यांवरील दीर्घकालीन वाद मिटवणे शेतकर्‍यांसाठी वाहतूक सुलभ करणे आधुनिक शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे शेतरस्त्यांचे मजबुतीकरण
फायदे: शेतकर्‍यांना होणार्‍या त्रासापासून सुटका अतिक्रमण हटवण्याचे काम सुरळीत चालू शेतकरी आपापसातील वादातून फायदा घेऊ शकतील
शेत रस्ते आणि पाणंद रस्ते मोकळे होऊन वाहतूक सुलभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले: हा निर्णय आधुनिक शेतीसाठी, शेतकर्‍यांच्या सुविधा वाढवण्यासाठी आणि दीर्घकालीन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ६० वर्षांनंतर सरकारने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय ऐतिहासिक ठरेल.
माझ्या ‘शिव पाणंद’ला महसुलमंत्र्यांनी न्याय दिला- पवळे
माझ्या शेतरस्त्यासाठी जो त्रास मला झाला तो माझ्या कोणत्याही शेतकरी भावाला होऊ नये. प्रत्येक गरजवंत शेतकर्याला जोडत तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रशासनापर्यंत न्यायासाठी संघर्ष केला. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सरकारने लक्ष दिले आणि महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांची फौज तयार झाली. परिणामी, सरकारने ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळी’ला दखल दिली आणि अनेक महत्वाचे शासन निर्णय अमलात आले. या यशामुळे आता शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी हा नारा प्रत्यक्षात साकार झाला आहे. शरद पवळे, प्रणेते
अखेर, महसूल मंत्री ठरले ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळी’च्या शेतकरी भावांसाठी यशाचे मानकरी. शेतकर्‍यांसाठी न्याय आणि सुविधा मिळवण्याच्या लढ्यात शिव पाणंद चळवळीला महाराष्ट्र सरकारची पूर्ण साथ मिळाली आहे.

ताज्या बातम्या