बीड : परमपूज्य श्री माताजी निर्मला देवींच्या परमकृपेत बीड येथे ६ , ७ डिसेंबर २०२५ रोजी दीड दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त साधकांनी या कार्यशाळाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग महाराष्ट्र समितीच्या, बीड सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड,छ.संभाजी नगर, जालना, परभणी जिल्ह्यातील सर्व सहजयोगी ताई आणि भाऊंना कळविण्यात आनंद होतो की,परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत ६,७ डिसेंबर २०२५ रोजी मराठवाड्यातील ४ जिल्हे विभागीय कार्यशाळा दीड दिवसीय कार्यशाळा पार पडणार आहे. यामध्ये सहज उपचार,ध्यानाची गहनता आणि परम चैतन्याची जाणीव या विषयावर डॉ.विश्वजीत दादा चव्हाण आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे. ी माताजींनी सांगितलेल्या सर्व सहज उपचार पद्धती यांचे ज्ञान आणि प्रात्यक्षिक,तसेच परमचैतन्याची जाणीव, ध्यानाची गहनता याबद्दल या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दीड दिवसीय कार्यशाळा ही बीड येथील आर्या मंगल कार्यालय, धानोरा रोड या ठिकाणी ६ डिसेंबर सकाळी ९ वाजल्यापासून ते ७ डिसेंबर दुपारी २ पर्यंत पार पडणार आहे.
तरी या कार्यशाळेला येताना सहज उपचार पद्धती करण्यासाठी ज्या वस्तू लागतील, त्या सोबत घेऊन याव्यात.. याची यादी लवकरात लवकर पाठवण्यात येईल.तसेच या दीड दिवसांमध्ये सर्वांची राहण्याची, जेवणाची सोय करण्यात आलेली आहे..सर्व जिल्ह्यातील सहजयोग्यांनी लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन खाली दिलेल्या नंबर वर करून घ्यावे.. आणि आपली उपस्थिती नोंद फिक्स करावी, जेणे कारून कार्यशाळा सत्र वेळेवर सुरू होतील , आणि लवकरात लवकर संपूर्ण नियोजन करता येईल . त्यामुळे नियोजन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सहजयोग महाराष्ट्र समिती, बीड सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
९९६०२०२१५२,
९४२२९६३५८५,
८८०६४४०२१५

