spot_img
5.1 C
New York
Tuesday, November 18, 2025

Buy now

spot_img

बीडमधील तरूणाच्या रूमवर तरूणीची आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या २९ वर्षीय तरुणी मित्राच्या रूममध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मित्राने दिलेल्या त्रासाला कंटाळून तरुणीने मृत्यूला कवटाळले, तिचा खून झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात जवळपास पाच तास ठिय्या दिला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिस निरीक्षक ओमकांत विचोलकर यांनी याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
अर्धापूर येथील रहिवासी शीतल पद्माकर मोरे ही नांदेड येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. दरम्यान, तिने १६ नोव्हेंबरच्या उत्तररात्री पांगरी येथे मित्राच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपुरी वैधील शासकीय रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी गुन्हा दाखल करा मगच उत्तरीय तपासणी करा, त्याशिवाय मृतदेह साब्यात घेणार नाही, असे सांगत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.
मागील तीन वर्षांपासून शीतल मोरे आणि आरोपी तरुण माधव सोनाजी काळे (रा. माजलगाव, जि. बीड ह. मु पांगरी (ता. जि. नांदेड) यांची ओळख होती. सुरुवातीच्या ओळखीचे कालांतराने मैत्रीत रूपांतर झाले, तेव्हापासून आरोपी तिला कोणत्या ना कोणत्या कारणांवरून त्रास देता होता. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री शीतल मित्राच्या रूमवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. शीतलचा मृत्यू आत्महत्या नसून हा खून आहे. खून केल्यानंतर आत्महत्या केल्याचे भासविण्यात आल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. १७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमाव नांदेड ग्रामीण ठाण्यात बसून होता. तूर्त पोलिसांनी ऍट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपअधीक्षक प्रशांत शिंदे, पोनि ओमकांत चिचोलकर, बाळासाहेब रोकडे, सपीनि रेखा करो, विजयकुमार कांबळे, पोउपनि ज्ञानेश्वर भोसले, उद्धव भारती आदींनी जमावाची बाजू समजून घेत परिस्थिती योग्यरीत्या हाताळली.
मृत शीतल मोरे हिचे शवविच्छेदन विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले आहे. परंतु तिचा मृत्यू आत्महत्या नसून खून असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केल्याने मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे पुन्हा इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या