बीड : उमेदवारी अर्ज दाखल कण्याच्या शेवटच्या क्षणी सर्वच पक्षांनी आप आपल्या उमेदवारांचे नाव घोषीत करून अंदाज बांधणार्यांना एकप्रकारे धक्का दिला. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून शेख मुजीब यांच्या हातात घडी बांधण्यात आली तर तिकडे कालच भाजपात डेरेदाखल झालेले योगेश क्षीसागर यांनी डॉ. घुंबरे यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन भाजपाला चर्चेत आणले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनेक नाव चर्चीले जात होते मात्र ऐनवेळेस विष्णू वाघमारे यांच्या पत्नींची उमेदवारी घोषीत करण्यात आली. तर एमआयएमही निवडणूक रिंगणात उतरल्याने बीड नगपालिकेची निवडणूक ही अत्यंत लक्षवेधक आणि चित्तथरारक होण्याची शक्यता आहे. बीड नगरपालिका अध्यक्षपदासाठी कोण उमेदवार असणार? यावर गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चा होत होती. एकाही पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत अध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा केली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला अर्धा तास राहिला तोपर्यंत एका एका पक्षाकडून उमेदवारांचे नाव समोर येत राहिले. सर्वप्रथम नाव आले अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून शेख मुजीब यांच्या हाती अजितदादांनी घड़ी बांधली, मुजीब हे या ते निवडणुकीमध्ये आपल्या सासुला किंवा पत्नीला निवडणूक रिंगणात उत्तरवू शकतात. त्या दोघींनीही प्रेमलता दादाराव पारवे व तेजस्विनी दादाराव पारवे या दोघींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इकडे भाजपात कालच डेरेदाखल झालेले डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्त्वात भाजप उद्याची निवडणूक लढवत असून योगेश क्षीरसागर यांनी डॉ. घुंबरे यांच्या पत्नी डॉ. ज्योती घुबरे यांना उमेदवारी घोषीत केली. शेवटच्या क्षणापर्यंत
शरद पवारांच्या राष्ट्रबादीकडून उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शरद पवारांची राष्ट्रबादी निवडणूक लढवत असून ऐनवेळेस विष्णू बाघमारे यांच्या पत्नी उमेदवारी घोषीत करण्यात आली तर एमआयएमनेही या ठिकाणी उमेदवार दिला असून एमआयएमकडून इनामदार या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. बीडमध्ये सद्यस्थितीला चौरंगी लढत होण्याचे चिन्हे दिसून येत आहेत.

