बीड : मागील दोन दिवसापासून बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या दोन दिवसात ऑनलाईनद्वारे ५१ अर्ज नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दाखल केले आहेत तर ऑफलाईन १ अर्ज दाखल झालेला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात इच्छुक उमेदवार आणि पक्षीय उमेदवार आपले अर्ज दाखल करतील. आज पर्यंत तरी मागील तीन दिवसामध्ये ऑनलाईनद्वारे ५१ अर्ज दाखल झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी निवडणूक निर्णय अधिकारी नगरपालिका त्यांच्याकडे दाखल करणे गरजचे असते. जोपर्यंत हार्ड कॉपी दाखल होत नाही तो पर्यंत हा अर्ज अधिकृत धरला जात नाही. कदाचित ऑनलाईनआलेले ५१ अर्ज हे डमी उमेदवाराचे असु शकतात असे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती जाधव यांनी सांगितले तर ऑफलाईन आलेला नगरसेवक पदाचा एक अर्ज दाखल झाला आहे. मात्र ऑफलाईन अर्ज दाखल करणार्यांनी हा अर्ज ऑनलाईन दाखल केलेला नाही त्यामुळे या अर्जाबाबत अधिकृत रित्या काही सांगता येणार नाही असे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितले. तिकिट वाटप आणि इच्छुक उमेदवार हे शेवटच्या दोन दिवसात आपले उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

