ज्ञानेश्वर काकड | नाशिक
सौ.उज्ज्वला व श्री.रामनाथ आनंदा गिते यांचे सुपुत्र चिरंजीव सागर यांचा शुभविवाह शुक्रवार, दि. ७ तारखेला दुपारी १२:३५ वाजता कर्तव्य लॉन्स , गोंदे फाटा, सिन्नर येथे मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहे.
यापूर्वी गुरुवार दि. ६ तारखेला गावामध्ये आयोजित होणारी डिजे लावून नवरदेव मिरवणूक न काढण्याचा अत्यंत स्तुत्य आणि समाजाला प्रेरणा देणारा निर्णय गिते कुटुंबीयांनी घेतलेला आहे. या सामाजिक जाणिवेने परिपूर्ण कृतीबद्दल चिरंजीव सागर व गिते कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!

गिते कुटुंबाने गावात ऊग लावून मिरवणूक न काढता, त्याऐवजी शिस्तबद्ध व संस्कारमय वातावरण निर्माण करून समाजात एक नवीन पायंडा, एक नवीन संस्काराची दिशा दाखवली आहे. हा निर्णय खरोखरच अनुकरणीय, प्रशंसनीय आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे. या प्रशंसनीय उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणवाडे ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने सौ. उज्वला व श्री. रामनाथ आनंदा गिते व चिरंजीव सागर यांचा सत्कार करण्यात आला.
चिरंजीव सागर यांनी ग्रामपंचायतीला ३० आंबा झाडांची रोपे भेट स्वरूपात देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच ग्रामस्थांना जास्तीत जास्त वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन केले. पोलिस पाटील श्री. कमलाकर रामराजे** यांनी गिते परिवाराकडून आंबा झाडाचे रोप स्वीकारून सर्व ग्रामस्थांच्या वतीने चिरंजीव सागर यांना विवाहाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद दिले. ग्रामस्थ व महिला मंडळींनी नवरदेवावर अक्षता उधळून मंगलाशीर्वाद दिले,तसेच नवविवाहित दांपत्याच्या सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी गणपती बाप्पा चरणी मनोभावे प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! नवदांपत्यास आयुष्यभर प्रेम, सौख्य, समृद्धी व मंगलमय जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा!

