ज्ञानेश्वर काकड | नाशिक
जि.प.प्राथ.शाळा ब्राम्हणवाडे येथे आज दि. २५/१०/२०२५ वार -शनिवार रोजी माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावचे सरपंच मा.श्री. विलास जी गिते होते. प्रमुख पाहुणे म्हणून सानप ऍग्रो चे संचालक मा.श्री. रामदास सानप, गावचे पोलीस पाटील मा. श्री कमलाकर रामराजे होते. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दिलीप जी गिते, उपाध्यक्ष कैलास जी गिते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला.
जि. प. प्राथ. शाळेतून शिक्षण घेऊन उच्च पदावर असलेले, उद्योजक, नोकरदार विद्यार्थी उपस्थित होते.ते जीवनात यशस्वी झालेत.
प्रत्येकाने आपल्या मनोगतातून शाळेविषयीचे प्रेम,जाणीव जिव्हाळा , शाळेसाठी काहीतरी करण्याची तळमळ व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पगारे मॅडम यांनी माझी शाळा, माझा अभिमान या कार्यक्रमाचा उद्देश प्रास्ताविकेतून सांगितला,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली उमराणे मॅडम यांनी केले. कार्यक्रमास ब्राह्मणवाडे केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री शिंदे साहेब उपस्थित होते. *माझी शाळा माझा अभिमान या कार्यक्रम अंतर्गत *माजी विद्यार्थी मेळावा* कार्यक्रमासाठी सिन्नर पं. स. गटशिक्षणाधिकारी मा. श्री. डामसे साहेब, ब्राह्मणवाडे बीटाच्या विस्तार अधिकारी मा. श्रीमती अहिरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

