वडवणी : दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडीफाटा येथे केंद्रीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. धाईतिडक सर, प्रमुख पाहुणे श्री. बगाडे सर, प्रमुख मार्गदर्शक श्री. उजगरे साहेब तसेच सहाय्यक मार्गदर्शक श्री. करांडे सर यांच्या उपस्थितीत परिषदेला सुरुवात झाली. सूत्रसंचालन इंग्रजी व हिंदी भाषेत श्रीमती मोरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली.
या परिषदेचा मुख्य उद्देश शिक्षकांना उपयुक्त असे प्रशिक्षण देणे हा होता. उएऋठ ढीरळपळपस मध्ये भाषिक कौशल्यांचे आंतरराष्ट्रीय निकष, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन आणि संवादकौशल्यातील सुधारणा यावर मार्गदर्शन झाले. घहरप Aलरवशू ढीरळपळपस अंतर्गत डिजिटल साधनांचा वापर करून गणित, विज्ञान, भाषा या विषयांचे अध्यापन अधिक रोचक व परिणामकारक कसे करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि शंका निरसन सत्र संवादात्मक झाले.
प्रशिक्षणानंतर पारंपरिक लापशी-भाताचे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी श्री. बगाडे सर, श्री. राऊत सर, श्री. शेख सर, श्रीमती शेख मॅडम, श्रीमती वरोडे मॅडम, श्री. चांभारे सर आणि श्रीमती मोरे मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले. शेवटी आभार प्रदर्शन श्री. राऊत सर यांनी केले. शिक्षण हा समाजपरिवर्तनाचा मुख्य मार्ग असल्याचा संदेश देत या परिषदेला प्रेरणादायी सांगता झाली.