वडवणी : तालुक्यातील जि.प.प्रा.शा. देवडीफाटा येथे शनिवार दि.२० सप्टेंबर २०२५ या दिवशी एक संस्मरणीय व भावनिक सोहळा संपन्न झाला.शाळेत दोन कर्तव्यनिष्ठ व आदर्शवत शिक्षकांचा निरोप घेताना डोळे पाणावले, तर दोन नव्या शिक्षकांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवडी गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा मा.पं.स.सदस्य श्री मच्छिंद्रबप्पा झाटे हे होते.तसेच मा. सरपंच श्री विश्वास आगे, शा.व्य.स.अध्यक्ष परमेश्वरजी आगे, उपाध्यक्ष ओबेदभाई पठाण,पिंपरखेड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गणेशजी धायतिडक साहेब, पांडुरंग झाटे,कुमार गायकवाड,गितेश आगे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख सर यांनी केले.तदनंतर
या कार्यक्रमामध्ये श्रीराम सोपानराव सुरवसे सर आणि सुदाम विठ्ठलराव खाटवकर सर यांच्या निरोपाचा कार्यक्रम घेण्यात आला.या दोघांचाही कपडे, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रप्रमुख श्रीमान गणेश राव यांचे एक भव्य फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला . त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अध्यक्ष श्री परमेश्वरजी आगे,विश्वासजी आगे,गणेशजी धायतिडक साहेब,श्रीम.वरोडे मॅडम, श्रीम.मोरे मॅडम यांनी आपले मनोगत व बदली झालेल्या सहकार्यांविषयी ऋण व्यक्त केले . तसेच सत्काराला उत्तर देताना श्री खाटवकर सर आणि सुरवसे सर यांनी आपले विचार व्यक्त केले.तसेच शाळेबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.तसेच केंद्रप्रमुख श्री गणेश धायतिडक आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री बगाडे यांनीही आपले सखोल विचार व्यक्त केले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र झाटे यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. शाळेच्या उभारणीत या दोन्हीही शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांनी त्यांचा गौरव केला.उपस्थित मान्यवर व शिक्षक आपले मनोगत मांडताना अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.निरोप देताना संपूर्ण शाळेत भावनिकता पसरली होती.विद्यार्थ्यांनाही आपले आश्रु आवरता आले नाही.
यावेळी शाळेत नव्याने आलेल्या गोवर्धन राऊत आणि सुर्यकांत चांभारे यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करत त्यांना फुलगुच्छ दिले. पालक व मान्यवरांनी नव्या शिक्षकांकडून शाळेच्या प्रगतीबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी निरोप घेणारे शिक्षक या शाळेने दिलेले प्रेम, स्नेह व सहकार्य अविस्मरणीय आहे, असे म्हणत भावुक झाले. तर नवागत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. संपूर्ण कार्यक्रमात निरोपाची हूरहूर व स्वागताचा उत्साह यांचा सुंदर संगम दिसून आला. या सोहळ्याने देवडीफाटा शाळेच्या इतिहासात एक भावनांनी ओथंबलेला अविस्मरणीय ठसा उमटवला.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ट्रेनि टीचर श्रीम.पुरी मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन शेख सर यांनी केले.तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्वश्री बगाडे साहेब, शेख सर, राऊत सर, चांभारे सर, शेख मॅडम, मोरे मॅडम, वरोडे मॅडम, दरेकर मामा या सर्वांनी सहकार्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी श्री खटावकर सर व श्री सुरवसे सर यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांना स्वादिष्ट पुलाव आणि जिलेबी चे भोजन देण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.